मुंबई राजमुद्रा | सणासुदीच्या तसेच मुहूर्तांच्या काळामध्ये अनेक ऑफर्स बँकांकडून तसेच फायनान्शिअल कंपन्यांकडून दिले जातात, अनेक जणांचे घराचे स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत करताना दिसतात मात्र जेव्हा बँकांचे व्याज भरण्याची वेळ येते तेव्हा अनेक जण थांबतात. आणि आपल्या घराचे असलेले स्वप्न यावर पाणी फिरतात अनेक सवलती दिल्या जातात मात्र गृह कर्जाचे व्याज पाहता अनेक जणांना आर्थिक तणाव निर्माण होतो.
गृह कर्जावर सरासरी सध्या बँक आणि फायनान्शिअल कंपन्या आठ टक्के व्याजदर आकारात आहे जर तुम्ही या व्याजदराने 15 ते 20 वर्षासाठी कर्ज देत असाल तर मूड रकमे इतकेच व्यास तुम्हाला बँकेत भरावे लागते. यासाठी तुम्हाला दुप्पट रक्कम बँकेला द्यावी लागते, याच कारणामुळे अनेक जण मालमत्ता खरेदीसाठी गृह कर्ज घेण्यास घाबरतात पण याबाबत तरुण अधिक सजग झाले आहेत. बँकांमध्ये भरावी लागणारी व्याजाची गृह कर्जाची रक्कम दुसऱ्या मार्गाने पर्याय म्हणून वसूल करण्याचा फंडा अवलंबतात आणि तो फायदेशीर देखील ठरतो.
यासाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या म्युच्युअल फंडची चलती आहे. म्युच्युअल फंडात केलेली गुदवणूक केव्हाही फायदेशीर ठरू शकते घर खरेदी वेळेस काहीजण योग्य म्युचल फंड निवडतात आणि त्यात एसआयपी द्वारे गुंतवणूक करतात, त्यामुळे एकाच वेळी खर्च आणि गुंतवणुकीचा कुठलाही ताण गृह कर्जदात्याला येत नाही यामध्ये साधी सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही 50 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले आहे. आणि वीस वर्षासाठी त्यावर बँकेकडून व्याजदर लावण्यात आले आहे, तुम्हाला बँकेला एक कोटी रुपये चुकवावे लागतील हा खर्च काढण्यासाठी तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल 50 लाख रुपयावर आठ टक्के वार्षिक व्याजदराने तुम्ही कर्ज घेतले आहे. तुमचा मासिक हप्ता 41,822 होईल वीस वर्षासाठी तुम्ही एकूण 50.37 लाख रुपये गेले घराची किंमत 50 लाख रुपये आणि त्यावर व्याजाची रक्कम 50.37 लाख रुपये आहे.
घरासाठी तुम्हाला एकूण 1 कोटी 37 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे यामध्ये म्युच्युअल फंडात जर तुम्ही मासिक हप्त्याच्या 25% गुंतवणूक कराल म्हणजे दहा हजार 912 रुपयाची एसआयपी सुरू करा तर फायदा तुम्हाला होणार आहे. यामुळे गृह कर्जाचा तणाव तुमचा कमी होणार आहे.