नवी दिल्ली राजमुद्रा | राज्यसह देशभरात आता वाहतूक नियम अतिशय कडक करण्यात आल्याने वाहनधारकांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या नियम नागरिकांना दंडाची तरतूद असल्यामुळे आर्थिक भूदंड बसणार आहे. मात्र तरी देखील भारतातील काही लोक या नियमाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. उद्यापासून वाहनधारकांनी केंद्रातील वाहतूक नियमाचे पालन न केल्यास पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
यामध्ये सरासरी दुचाकी व चार चाकी वाहनातून प्रवास करणारे चालक मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना हेल्मेट तसेच सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आले आहे. एक नोव्हेंबर पासून हा सत्तेचा नियम वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर स्वीट बेल्टची व्यवस्था नाही. अशा वाहनांना सीट बेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली पंधरा दिवसाची मुदत आज सोमवारी संपत आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप पर्यंत मागील सीटबेल्ट बसवलेले नाही, अशांना आता पोलीस कारवाईला सोमवारे जावे लागणार आहे. त्यामुळे सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीप्रमाणे ही सक्ती अधिक कठोर केली जाणार आहे.
वर्षभरात झालेले अपघात तसेच दिलेल्या नियमानुसार पाळण्यात आलेले नियम, तरी देखील अनेक नागरिकांचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर केंद्रातील वाहतूक नियमांमध्ये काही तुरळक बदल करण्यात आले यामध्ये मागील सीट धारकाला हेल्मेट सक्ती व चार चाकी मधील मागील सीट धारकाला सीट बेल्ट सक्ती करण्यात आली आहे. यामुळे बऱ्या प्रमाणात अपघातात दुर्दैवी मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज केंद्रातील वाहतूक विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान वाहतूक पोलिसांनी 14 ऑक्टोंबर ला यासंदर्भात सूचना जाहीर केल्या होत्या मोटर वाहन (सुधारित कायदा) 2019 कलम 194 (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चार चाकी मोटार वाहनातील वाहन चालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीट बेल्ट न लावल्यास पोलिसांकडून दंड आकारण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.
ज्या वाहनधारकांनी अद्याप पर्यंत मागील सीट बेल्ट लावले नसतील त्यांना आजचा 31 सप्टेंबर हा शेवटचा दिवस असून मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीट बेल्ट लावला नसेल तर इ चलन करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सर्वव्यापी असून सरसकट करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.