मुंबई राजमुद्रा | मागील काळापेक्षा आता शैक्षणिक क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले असून शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर चांगले नोकरी मिळावी यासाठी तरुणांना मोठे अपेक्षा असते मुळात ह्या अपेक्षा त्यांच्या परिवारातील लोकांच्या देखील असतात मात्र यासाठी आताच्या बेरोजगारीच्या विळाख्यात अनेक तरुण भरकटलेले दिसत येतात मात्र मुंबईतील या बँकेकडून तरुणांना मोठी ऑफर देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता असताना तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो प्रयत्न करून देखील मनासारखी नोकरी मिळत नाही त्यात ते खुश देखील नसतात काही वेळा योग्य माहिती नसल्याने संधी देखील गमावून बसतात मात्र मुंबईसारख्या मायानगरीमध्ये आपल्या करिअरला चमकवण्याची सुवर्णसंधी तरुणांसाठी चालून आली आहे कारण मुंबईतल्या बँकेमध्ये गरजू तरुणांचा नोकरीचा ताण मिटणार आहे.
ExIM बँक टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरू आहे यामध्ये नेमकी काय शैक्षणिक पात्रता आहे हे जाणून घ्या.
पोस्ट – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, B.E., B.Tech, MBA
एकूण जागा – 45
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी – www.eximbankindia.in (या वेबसाईटवर तुम्हाला इतर सविस्तर माहिती मिळेल )
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता – M.D./ D.M/ DNB/ M.CH/ MDS / किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी, अनुभव
एकूण जागा – 14
दुसरी पोस्ट – वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer
शैक्षणिक पात्रता – ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि 5 ते 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 1
तिसरी पोस्ट – तंत्रज्ञ / Technician
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण, ITI / डिप्लोमा, 1 ते 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 2
नोकरीचं ठिकाण – मुंबई, गुवाहाटी, विझाज
या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी – tmc.gov.in (या वेबसाईटवर तुम्हाला इतर सविस्तर माहिती मिळेल )