मुंबई राजमुद्रा | गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरात ऑनलाईन पैसे गायब होण्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे वाढल्या आहे. मात्र या प्रकरणांमध्ये पाहिजे तितके यश चौकशी दरम्यान पोलिसांना येत नसल्याने नागरिक देखील अहवालदिल झाले आहे. असंख्य केसेस पोलिसांकडे व न्यायालयात प्रलंबित असून अद्याप पर्यंत नागरिकांना त्यांचे ऑनलाईन गायब झालेले पैसे मिळालेले नसल्याने आर्थिक भूदंड बसत आहे.
मात्र तक्रारदारच आपला स्मार्टफोन वापरताना अनेक चुका करीत असल्याचे या घटना दरम्यान समोर आले आहे प्ले स्टोर वर अनेक बेकायदेशीर ॲप्स सक्रिय असून ते डाऊनलोड केल्यानंतर त्या ॲपच्या माध्यमातून युजरच्या पर्सनल डेटा हॅक करून पैसे गायब होण्याच्या घटना वाढल्या आहे मात्र स्मार्टफोन युजर्स याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ऑनलाइन पेमेंट, नेट बँकिंग मुळे आपणच आपल्या खात्यातील पैसे गायब करण्यास हॅकर्सला मदत करीत आहोत का ? हे पाहणे गरजेचे आहे. कारण या सर्व व्यवहारावर हॅकरची करडी नजर असून कोणत्या खात्यातून कधी कुठे पैसे ट्रान्सफर होतात याकडे हॅकर्स लक्ष देऊन आहे. आपलं खातं यासाठी सुरक्षित कसे ठेवायचे याबाबत आपणास काही खास टिप्स देत आहोत.
दरम्यान गेल्या काळात गुगलने प्ले स्टोअर वरून काही ॲप्स डिलीट केले युजर ची खाजगी माहिती लिंक होत असल्याचा आरोप या ॲपच्या माध्यमातून लावण्यात आला. मेटा (Facebook) फेसबुक न केलेल्या दाव्यानुसार साधारण दहा लाख युजरने असे ॲप्स वेगवेगळ्या ऑफरमुळे डाऊनलोड केले होते. यामुळे त्यांचे खाजगी माहिती देखील हॅकर्स पर्यंत लिंक झाली यामध्ये बँक खात्यासंदर्भात देखील माहिती हॅकर्स कडे प्राप्त झाल्याचे समोर आले होते.
मोबाईलवर कोणताही ॲप्स डाऊनलोड करताना या अगोदर त्या ॲपची संपूर्ण माहिती मिळवा ते ॲप्स सुरक्षित आहे का ? याबाबत अगोदर शहानिशा करा, जर ते ॲप्स आपल्याकडून चुकून डाऊनलोड झाले असेल तर ते तात्काळ डिलीट करा. अनावधानाने कुठलेही दुर्लक्ष या ॲप कडे झाल्यास आपल्या खात्यातील पैसे ऑनलाईन गायब होऊ शकतात नंतर आपल्यावरच स्पष्टतापाचे वेळ येते म्हणून असं होऊ देऊ नका.