मुंबई राजमुद्रा | आपण एखाद्या वेळेस फिरण्यासाठी एखाद्या दौऱ्यावर जातो अथवा घराबाहेर पडल्यानंतर एखाद्या ठिकाणापर्यंत जायचं असेल किंवा त्या ठिकाणाची माहिती व्यवस्थित नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही कारण गुगल मॅप्स प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे हे ॲप्स आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी अचूकपणे मार्ग दाखवते.
मात्र एवढंच नाही वाहतूक कोंडीतून देखील आपल्याला जलद मार्गाने पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य करते. यासोबतच ज्या मार्गावरून आपण जाणार आहोत त्या ठिकाणाच्या टोल नाकाची रक्कम देखील आपल्याला हे ॲप्स कळवते ज्या ठिकाणावर आपल्याला जायचे आहे ते आपल्याला किती वेळा शक्य आहे ती वेळ देखील गुगल मॅप वर दिसून येते मात्र गुगल मॅप ची तुमच्यावर करडी नजर आहे जर तुम्ही सर्व हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट केले नाही तर तुम्हाला यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
जर तुम्ही संबंधित स्थळावर पोहोचण्यासाठी नेव्हिगेशन सेवा वापरत असाल तर जुना डेटा सेव करण्याच्या मदतीने ते सोपे होते ॲप्स करताना वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी डेटा देखील संग्रहित करतो म्हणजे गुगल नकाशे हे माहीत आहे की तुम्ही दिवसाच्या कोणत्या वेळी कुठे जात आहात आणि तुम्ही आतापर्यंत कोणत्या स्थानावर भेट दिली आहे त्यामुळे तुम्ही कधी कुठे आणि किती वेळा जाता आहे हे गुगल वर ऑनलाइन सेव होत आहे म्हणजे गुगलला तुमच्या रोजच्या दिवसाचे अपडेट मिळत आहे यामुळे तुमचा पर्सनल डेटा तुम्हाला सांभाळून लिंक न होऊ देता वापरायचा आहे.
यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत गुगल मॅप्स वरील सर्व हिस्ट्री आणि लोकेशन डेटा हटवणे एवढे सोपे नाही यासाठी दीर्घकालीन प्रक्रिया असून आपल्याला प्रतीक्षा करावी लागू शकते मात्र गुगलचा कोणताही रेकॉर्ड तुम्हाला नको असेल तर यासाठी त्याच्याशी संबंधित सेटिंग बदलता येतील व हिस्ट्री क्लिअर करण्यासाठी काय करायला हवा हे देखील आपणास सांगणार आहोत.
• आपल्या स्मार्टफोन मध्ये Google Maps मॅप्स उघडा.
• स्मार्टफोनच्या उजव्या कोपर्यात दाखवलेल्या प्रोफाईल फोटोवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्ज आयकॉनवर स्किक करावे लागेल.
• आगोदर खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला Maps History चा पर्याय दिला आहे, तो सिलेक्ट करावा लागेल.
• येथे तुम्हाला टाइमलाइन निवडण्याचा आणि हटवण्याचा पर्याय आहे. आणि तुम्ही ‘ऑल टाईम’ सर्च हिस्ट्री डिलिट करू शकाल.