(राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्रात राजकारणावर फार मोठ्या घडामोडी होत असतात. या पार्श्वभूमीवर आज एका नवा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळाला असून भाजप शिवसेनेची पुन्हा युती होणार असल्याची शक्यता महत्त्वाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा नारा असताना शिवसेना राष्ट्रवादी ‘आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या शिवाय’ अशा अविर्भावात दिसून आली आहे. या घडामोडीला परिणाम प्राप्त होत नाही तोवरच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या गेल्या चार-पाच दिवसांच्या हालचाली तसेच फोनवर चाळीस मिनिट झालेल्या चर्चेनुसार खात्रीलायक सूत्रांकडून युती होण्याचे खळबळजनक धागेदोरे मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यासोबतच एक गुप्त बैठकही घेतल्याने चर्चा रंगली होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली भेटीनंतर गेल्या आठवडाभरात सुमारे पाऊण तास दोघांची चर्चा असल्याचे उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे विश्वासू सूत्रांकडून मिळाल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या धर्तीवर हा सर्वात मोठा भूकंप म्हटल्याचे वावगे ठरणार नाही. कारण युतीच्या दिशेने होणारी ही हालचाल महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून काढण्यास सक्षम ठरणार आहे.