मुंबई राजमुद्रा | प्रत्येक दिवसाला शासनाकडून तसेच केंद्रीय यंत्रणाकडून नियमाने नागरिकांच्या हितार्थ वेगवेगळे नियमात बदल केले जात आहे. यासाठी रोजच्या दिनचर्येवर मोठा परिणाम देखील होत असतो यामध्ये कधी सवलती असतात तर कधी सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक अडचण निर्माण करणारा असतो. आज पासून केंद्रीय अर्थव्यवस्थेतून एलपीजी गॅसच्या किंमती, बँकिंग प्रणाली ट्रेनच्या वेळा इत्यादींमध्ये सरकारकडून बदल करण्यात आला आहे. नेमके काय बदल झाले आहे हे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे.
गॅस किंमत मोठे बदल
देशभरात महागाई वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी देखील एक नोव्हेंबर पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती 115.50 रुपयाची कपात केली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडर गॅस च्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एक नोव्हेंबर पासून सर्वसामान्यांच्या जीवनात होणारा मोठा बदल म्हणजे गॅस सिलेंडरच्या होम डिलिव्हरी साठी तुम्हाला वन टाइम पासवर्ड ओटीपी (OTP) आवश्यक असणार आहे. सिलेंडर बुक झाल्यावर ग्राहकांना नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावरून ओटीपी क्रमांक पाठवला जाणार आहे, हे सांगितल्यानंतरच सिलेंडरची डिलिव्हरी केली जाईल
KYC बंधनकारक
दरम्यान केवायसी मध्ये अपडेट करण्यासाठी सरकारकडून वारंवार सूचना देण्यात येत आहे. आता इथून पुढे विमा कंपन्यांना केवायसी तपशील देणे बंधनकारक असणार आहे. सध्या नॉन लाइफ इन्शुरन्स kyc देणे तुमच्यावर अवलंबून असणार आहे. याकरिता उपभोक्त ग्राहकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.
आता लागणार 6 अंकी कोड
जीएसटी मध्ये देखील मोठे फेरबदल सरकारकडून करण्यात आले आतापर्यंत जीएसटी मध्ये HNS कोड 2 अंकी कोड टाकला होता, मात्र पाच कोटी पेक्षा कमी उलाढाल असलेल्या कर दात्यांना GST रिटन्स मध्ये HSN कोड समाविष्ट करणे बंधनकारक असणार आहे. एक एप्रिल पासून पाच कोटीहून अधिक इनकमिंग असणाऱ्या कर्जात यांना चार अंकी फोड अनिवार्य करण्यात आला होता, आता मात्र यानंतर १ ऑगस्ट २०२२ पासून सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ट्रेनच्या वेळेत बदल
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक बदल करण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना संयुक्त होणाऱ्या सुविधा देखील उपलब्ध करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेचा आहे. मात्र आता नेमके काय बदल भारतीय रेल्वेमध्ये झाले आहे. हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. एक नोव्हेंबर पासून सर्व रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. याची नोंद घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे.