धुळे राजमुद्रा | स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांजाची शेती उध्वस्त करत 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 14 लाख 42 हजार पेक्षा जास्तीची मानली जात आहे. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी परिसरात असलेल्या लाकड्या हनुमान शिवारात शेती आड गांज्याची लागवड केली होती. पिकांमध्ये लागवड केलेली गांजाची शेतीवर छापा टाकत पोलिसांनी उध्वस्त केली
गुप्त पद्धतीने अवैधपणे गांजा लागवड केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिरपूर तालुका पोलिसांच्या मदतीने माहिती मिळालेल्या घटनास्थळी छापा टाकला यामध्ये तूर, मका, कापूस या पिकांच्या आडून संशयतांनी गांजाची शेती केल्याचे आढळून आले आहे.
रॅकेटची चौकशी सुरू
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून सविस्तर चौकशी केली जात असून आणखी कोणी या रॅकेटमध्ये सक्रिय आहे का ? याबाबत चौकशी केली जात आहे. या संदर्भात दोघा संशयतांविरोधामध्ये शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.