जळगाव राजमुद्रा | आपल्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवदास इंगोले यांना लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडत अटक केली आहे याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार तक्रारदार यांचा मुलगा आकाश कुमावत यांच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशन ला 25 जुलै या दिवशी अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या याप्रकरणी इतरांचे नाव गुन्ह्यात घेऊ नये यासाठी वारंवार पोलिसांना तक्रारदार विनंती करत होते, मात्र पोलिसांना चिरीमिरी केल्याशिवाय काम होणार नसल्याचे त्यांना संबंधितांकडून सांगण्यात आले. त्यानुसार पुण्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना भेटले असता त्यांनी तुम्ही स्वतः तुमची पत्नी भाऊ व तुमची बहीण अशांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे 30 ऑगस्ट रोजी पंचायत समक्ष साठ हजाराची मागणी केली होती. त्यानंतर तोडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
या प्रकरणात रक्कम गायकवाड यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला व इंगोले यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापडा रचून सावदा पोलीस ठाण्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे असून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत एस पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेश सिंग पाटील बाळू मराठे ईश्वर धनगर व राकेश दुसाने या पथकाचा समावेश आहे.