जळगाव राजमुद्रा | शिंदे गटाचे बाळासाहेब यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन गटांमध्ये राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे असे असताना आज शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभांचे देखील महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
एकीकडे डायलॉग लढाई सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जाणत आहे तसेच महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील प्रमुख नेत्यांना टार्गेट केल आहे. त्यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज अंधारे यांनी जळगाव ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे या तीन महिन्याचा बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली, याच्या क्लिप एकदा एका असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला होता. चोपडा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी पत्रकारांची संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारें बाबत टीका केली होती. याबाबत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, मला तीन महिन्याचे बाळ मदत असतील तर बाळ जसा सर्व खोट्या करतो त्या करण्याचा मला अधिकार आहे. असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.
पारधी परिसरात महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावरून “ये डर मुझे अच्छा लगा” अशी मुश्किल प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी फलक चोरीवरून दिली आहे. याबाबत अज्ञात इसमानविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. महाप्रबोधनी यात्रेच्या निमित्ताने दुसरा टप्पा त्या जळगावातून सुरू करत आहे. त्यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.