राजमुद्रा | एकतर्फी प्रेमातून तरुणीवर आणि महिलांवर ऍसिड हल्ला झाल्याच्या घटना या अगोदर अनेक वेळा झाल्याचे आपण बघितले असेल. मात्र एकतर्फी प्रेमात तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीने थेट तरुणाच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकत हल्ला चढवल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. प्रेमात वेडा झालेल्या तरुणीने तू माझा नाही तर कोणाचाच होणार नाही, असा थेट धमकी वजा इशारा देत ऍसिड हल्ला तरुणावर केला आहे. पाच लिटर तरुणाच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकत गंभीर जखमी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामसिंह असं ऍसिड हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. श्याम सिंह झज्जर जिल्ह्याचा बहादूर गडचा रहिवासी आहे. सोनी पुतच्या मयूर विहारांमध्ये श्यामसिंह वास्तव्यास असून आत्या सोबत तो राहतो. शाम एका कंपनीत काम करीत असल्याचं त्याची आत्या अनिता यांनी सांगितलं. काही दिवसापूर्वी श्यामची मैत्री गुहांना गावात राहणाऱ्या एका तरुणीशी झाली तिने श्यामचा नंबर शिताफीने मिळवला, आणि रोज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने संवाद साधायला लागली.
काही दिवसानंतर श्याम चांगल्या प्रकारे संपर्कात आल्यानंतर तरुणीने तिच्या आईला घेत थेट श्यामचे घर गाठले तिच्याकडून श्यामला लग्नासाठी थेट मागणी करण्यात आल्याने श्याम देखील अवाक झाला. श्यामने याबाबत थोडा वेळ मागितला, मात्र तरुणी ही विवाहित असून ती पतीपासून वेगळी राहत असल्याचा श्यामला समजलं, त्यामुळे आपल्या आत्याला सांगून लग्नास नकार दिला, नकार ऐकून संतापलेल्या तरुणीने श्यामला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.
श्याम कोणत्याही प्रकारे ऐकून घेत नसल्याने तसेच लग्नासाठी नकार देत असल्याने श्याम वर प्रचंड संताप तरुणीचा झाला, दूध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या श्याम वर तरुणीने पाळत ठेवत, थेट चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याने श्याम चांगलाच जखमी झाला. त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार सुरू केले आहे.