मुंबई राजमुद्रा | राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई अद्याप पर्यत न्यायलायातत सुरू आहे. ठाकरे गट शिंदे गट एकमेकास जिव्हारी आणण्या साठी कोणताही मार्ग पत्करायला तयार आहे. दोन्ही गटात राजकिय अस्थितवा साठी राजकीय रणसंग्राम पेटलेला आहे. शिंदे गटातून झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले यामुळे काँग्रेस सह राष्ट्रवादी शिवसेना सत्य बाहेर गेली, पुन्हा भाजप, शिंदे गटासोबत सत्तेत आली, मात्र आता विविध कारणामुळे शिंदे गट वादग्रस्त ठरत आहे. कायदेशीर अडचणी यामुळे शिंदे गट घेरला गेला आहे. शिवसेनेची घटना पाहता शिंदे गट अडचणीत येण्याची दाट शक्यता कायदेविषयक तज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ शकते असे खळबळ जनक विधान घटना तज्ञ उल्हास बापट यांनी केले आहे.
दरम्यान न्यायालयाने दोघी गटाकडून झालेल्या दाव्यानुसार कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यावर उल्हास बापट यांनी कायद्यातील तरतूद सविस्तरपणे मांडली आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी लांबीवर पडली आहे. चार आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे.
शिंदे घटनांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सोडा आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे घटना तज्ञ उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार जर सोडा आमदार अपात्र झाले तर चाळीस आमदार देखील अपात्र होऊ शकतात असे मत बापट यांनी व्यक्त केले आहे.