जळगाव राजमुद्रा | गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा प्रशासनाकडून वाळू वाळू चोरी रोखण्यासाठी अनेक वेळा आदेश निघून देखील सरार्स पणे भर दिवस-रात्र वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. आता ही वाळू चोरी होत असल्यापासून तलाठी ते सर्कल इतके गाफील असतील काय ? प्रत्येक तलाट्याला आपली हद्द देण्यात आली असताना आपल्या हद्दीत नेमकं चालय काय ? याबाबत थोडी देखील माहिती नसेल काय ? हे प्रश्न महसूल विभागाकडून अनुत्तरीत आहेत.
मात्र असाच एक प्रत्यय वाळू चोरी प्रकरणात आल्याचे समोर येत आहे, वाळू चोरी करणारे एक वाहन एका पोलीस हवलदाराकडून पकडण्यात आले यावेळी वाळू वाहतुकीचा परवाना आहे का ? अशी विचारणा वाहन चालकाला करण्यात आली मात्र वाहन चालकांनी काहीच उत्तर न देता थेट आपल्या मालकाला फोन केला, आपले वाहन पकडले म्हणून शंभर फुटी वरून वाहत चालक चक्क 90 च्या स्पीडने आपल्या वाहनाजवळ दाखल झाला मग काय नेहमीप्रमाणे जाऊ द्या दादा.., करून घ्या दादा.., मात्र पोलीस हवालदाराने वाळू वाहन पुढील कार्यवाही साठी जप्त करावे लागेल असे सांगितले. दादा तुम्हीच इतकं अडून का बघताय साहेबाचा आशीर्वाद खास मला आहे, असे बोलून पोलीस हवालदार देखील चकित झाला अन एका मोठ्या साहेबांचा फोन येताच वाळू वाहन सोडून देण्यात आलं, वाळूची चोरी केलेलं देण्यात आल्याने वाहन मालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसोडून वाहत होता.
गिरणा नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी देखील वाढू माफिया थेट नदीमध्ये वाहने उतरवून बेकायदेशीर पाडूसा करीत आहे. यंदा झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये पाणी आहे. त्यामुळे वेगळी शक्कल लढवत वाळू माफियांनी वाहतूक सुरू ठेवली आहे. यामध्ये निमखेडी, भोकणी, आव्हानी, बांभोरी, खेडी, वननगरी, कानळदा आदी भागांमधून वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे.