नवी दिल्ली | गुजरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी आज आकाशवाणी भावली ते पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे गुजरात मध्ये येत्या एक आणि पाच डिसेंबरला मतदान होणार असून निकाल आठ डिसेंबर रोजी लागणार आहे गुजरात विधानसभेचे निवडणूक ही दोन टप्प्यात होणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आम आदमी पार्टी आणि भाजप या तीन पक्षांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली व पंजाब पर्टन राबवून आम आदमी पार्टी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे सांगितले जात आहेत, गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत असणाऱ्या भाजपने देखील निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले असल्याचे सांगितले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा त्याच ताकतीने भाजपने आपल्या विधानसभेतील जागा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर काँग्रेसच्या जागा गुजरातमध्ये वाढल्या होत्या, यासाठी नवनियुक्त काँग्रेसचे अध्यक्ष खरगे हे स्वतः गुजरात विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावणार असल्याचे सांगितले जात आहे.