मुंबई राजमुद्रा | टाटा समूहामध्ये महिलांसाठी सुवर्णसंधी चालून आले आहे. ज्या महिलांना नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित टाटाच्या या संधीला जाणून घेण्याची गरज आहे टाटामध्ये एकूणच महिला राज अवतारणार आहे.टाटा ग्रुप मध्ये 45000 महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना देशातील सर्वात मोठ्या उद्योग इंडस्ट्रीज मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
तामिळनाडूमध्ये होसुर जिल्ह्यात टाटाचा इलेक्ट्रॉनिक कारखाना आहे. यामध्ये कर्मचारी संख्या वाट्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही वर्षांमध्ये 45,000 महिलांची भरती या प्रोजेक्टमध्ये करण्यात येणार आहे. या फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट तयार करण्यात येतात विशेष म्हणजे या फॅक्टरीत आय फोन चे पार्ट्स देखील तयार केले जातात. कोरोनाच्या काळात निर्बंध लागल्यामुळे या फॅक्टरीमध्ये एप्पल चे उत्पादन थांबलं होतं, त्यामुळे आता भारतात देखील i फोनच्या उत्पादनावर भर दिला जात आहे.
एप्पल चे उत्पादन वाढत असल्याने येत्या दोन वर्षांमध्ये 45000 महिलांची भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही भरती खास महिलांसाठी टाटा ग्रुप सुरू करणार आहे. यापूर्वी सप्टेंबर मध्ये 5000 महिलांना टाटा ग्रुप मध्ये काम करण्याची संधी देण्यात आली, 500 एकर जागेत विस्तारलेला हा प्रोजेक्ट असून सध्या दहा हजार कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे.