जळगाव एरंडोल राजमुद्रा | महा प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या राज्याच्या दौऱ्यावर असून शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात थेट जाहीर सभेच्या माध्यमातून बंडखोरांवर शाब्दिक ताशेरे ओढत आरोपाच्या फेऱ्या झाडत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे
‘ गुलाब भाऊ..’ “हमने तुमको दिल दिया दिलदार समाज कर लेकिन तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझ कर” अशी शेरोशायरी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेतून झालेल्या बंडखोरीवर शाब्दिक समाचार घेतला आहे.
शिवसेनेकडून अनेकांना मोठ होण्यासाठी बळ देण्यात आल, मात्र तरी देखील पक्षासोबत गद्दारी झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आले. फक्त गद्दारीच नाही तर थेट शिवसेना हिसकवण्यासाठी गद्दारांचे प्रयत्न चालले आहे. मात्र ते त्यांच्याकडून शक्य नाही आगामी काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा थेट इशारा शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी बंडखोरांना दिला आहे.
यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या हरघर तिरंगा मोहिमेवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रम राबवला मात्र त्याचा टेंडर गुजरात मध्ये दिलं, आणि आम्हाला तिरंगा विकत घ्यायला लावला. आम्हाला झेंडा लावायचा आहे, पण घर कुठे आहे. असा सेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.