जळगाव (एरंडोल) राजमुद्रा | शिवसेनेतून सिद्ध गटात दाखल झालेले पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर महाप्रबोधन यात्रेतून शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडले आहे. चिमणराव.., “म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला” असावा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. असं संवाद देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्या सध्या चार दिवसीय महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून खास करून बंडखोरांच्या मतदार संघात त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या सभा होत आहे. महा प्रबोधन यात्रेमधून शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारान विरोधात त्यांच्या मतदार संघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिंदे गटातील दोन नेते सध्या राज्यभरात चर्चेत आहे. या दोन नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. मंत्री गुलाबराव पाटील व पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यात खूप काही अलबेल राहिल्याचे दिसून येत नाही अनेक घटनांमधून समोर आले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील सध्या नाराज आहेत. या वादाचे ठिगणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर देखील दोघांमधील वाद काही मिटायला तयार नाही. शिंदे गटात यापूर्वीच मंत्रिपदावरून अनेक आमदार नाराज आहेत. असे असताना मात्र जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील एकमेकाच भिडलेले दिसून येत आहे. हा वाद देखील मंत्रीपदावरच असल्याचे देखील सांगितले जात आहे.
चिमणराव पाटील हे मला माझ्या आजोबा सारखे आहे गुवाहाटीमध्ये चिमणराव पाटील यांचे चिर तारुण्य दिसलं, अशी देखील मिश्किल टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे भाजपाला बीएसएनएल बंद पाडायचा होता कारण अंबाडीचा जिओ त्यांना लोकांमध्ये आणायचा होता सर्पिंग को डाटा मात्र खाने को आटा नही अशी देस वर्षांची सध्याची अवस्था आहे यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांचे मिमिक्री करून दाखवली.