जळगाव राजमुद्रा | प्रिंप्राळा परिसरात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या रस्त्याचे लोकार्पण आज राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हातून करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रिंप्राळा परिसरात रस्त्याच्या विकासाची मागणी करण्यात येत होती, संपूर्ण रस्त्यांची खड्ड्यामुळे परिस्थिती होती. यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार अखेर प्रिंप्राळा परिसरातील आजाद नगर परिसरासह भागांमध्ये रस्ते लोकार्पण कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे.
शहराचा अतिशय दुर्गम भाग प्रिंप्राळा परिसर विकासापासून वंचित राहिला होता, मात्र उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून विकासाची कामानबाबत पाठपुरावा सुरू होता. यासाठी विशेष प्रयत्न उपमहापौरांच्या माध्यमातून या भागासाठी करण्यात आले.
महापालिका निधी, दलित वस्तीसुधार योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून 2 कोटी 73 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नागरिकांना रस्ते गटार तसेच मूलभूत सुविधांविषयी आश्वासन दिले होते. त्यानुसार आज नागरिकांना संयुक्त असा रस्ता तयार करण्यात आला आहे. दिलेला आश्वासनाप्रमाणे कामाची पूर्ती झाल्याचे समाधान यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील ,शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन लड्डा, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक किशोर बाविस्कर, माजी नगरसेवक जाकिर पठाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.