मुंबई: सोमवारी शेअर बाजाराने उच्चांकी सुरुवात केली. दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. BSE सेन्सेक्स 238 अंक किंवा 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 18,206 अंकांवर ट्रेड करत होता आणि NSE निफ्टी 89.90 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी वर होता.
NSE वर फार्मा, कंझ्युमर आणि हेल्थकेअर वगळता जवळपास सर्वच निर्देशांक वधारत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ऑटो, मीडिया, एफएमसीजी आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. निफ्टी पॅकमध्ये ब्रिटानिया सर्वाधिक लाभार्थी आहे. यानंतर एसबीआय, टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल, ग्रीसीम, नेस्ले, हिरो मोटोक्रॉप, आयशर मोटर्स, अदानी इन्टरप्राईजेस, मारुती सुझूकी, एचयूएल हे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये टायटन, सिप्ला, डॉ रेड्डीज, सन फार्मा, अदानी पोर्ट आणि एशियन पेंट यांचा समावेश आहे.
SBI आणि बँक ऑफ बडोदाच्या नफ्यात मोठी वाढ
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने शनिवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले, ज्यामध्ये बँकेचा नफा 74 टक्क्यांनी वाढून 13,265 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, बँक ऑफ बडोदाचे निकाल देखील उत्कृष्ट होते आणि दुसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा 59 टक्क्यांनी वाढून 3,313 कोटी रुपये झाला आहे. चांगल्या निकालानंतर बँक ऑफ बडोदाचा शेअर 9.96 टक्क्यांच्या वाढीसह 159 रुपयांवर व्यवहार करत होता आणि वृत्त लिहिपर्यंत एसबीआयचा शेअर 4.26 टक्क्यांनी वाढून 619 रुपयांवर होता.
डॉलरच्या तुलनेत रुपया वाढला
डॉलरच्या तुलनेत रुपया आज 22 पैशांच्या वाढीसह उघडला. सध्या सुरुवातीच्या व्यापारात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.13 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. डॉलरची ताकद दाखवणारा डॉलर निर्देशांक सध्या 111 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.