नवी दिल्ली : भारतीय पोस्ट विभाग हा भारतात सरकारी उपक्रम असून ही यंत्रणा भारत सरकारच्या अधीन आहे. नुकत्याच पोस्ट विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन अपडेट नुसार या विभागाअंतर्गत 98,093 जागा भरण्यात येणार आहेत.
भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी
पोस्ट विभागाच्या या भरती अंतर्गत महाराष्ट्रात पोस्टमॅन पदासाठी 9884, मेलगार्डसाठी 147, मल्टीटास्किंग स्टाफसाठी 5478 अशा एकूण 15,509 जागा आहेत. ही भरती 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्णांसाठी असणार आहे. उमेदवार त्यांच्या राज्य किंवा मंडळानुसार ऑनलाइन अर्ज भरू शकतात. त्यामुळे पात्र आणि इच्छूक उमेदवारांना पोस्ट विभागाची ही नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
अर्ज भरण्यासाठी मुदतीचा कालवधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा.
वयोमर्यादा
पोस्टमन, मेलगार्ड आणि मस्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष या दरम्यान असावे. SC, ST, OBC, PWD आणि PH उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
श्रेणींसाठी सवलती
SC/ST – 5 वर्ष सवलत
ओबीसी – 3 वर्ष सवलत
इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्युसाठी 10 वर्ष सवलत
पीडब्ल्यूडी एससी/एसटी – 15 वर्ष सवलत
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.