मुंबई राजमुद्रा | शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई येथे मातोश्री बाहेर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्या च्या निषेधार्थ मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर महिला शिवसेना आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे.
जळगाव देखील शहर पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना पदाधिकारी व जळगाव शहराच्या महापौर यांच्याकडून आंदोलन करण्यात आले होते, याप्रकरणी सुषमा अंधारे यांचे माफी मांगा अशी मागणी देखील जळगाव शिवसेनेकडून करण्यात आली होती
या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांचे पोस्टर झळकवत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी शिवसेनेच्या मीना कांबळे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण ?
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव तालुक्यात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. त्यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर सभेच्या माध्यमातून अंधारेकडून टीका करण्यात आली होती. या दरम्यान युवासेनेचे विस्तारक शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या सभेला कायदा सुव्यवस्थेचे कारण देत प्रशासनाकडून रद्द करण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा “नटी” म्हणून वादग्रस्त उल्लेख केल्याने वादंग निर्माण झाले आहे.