जळगाव : पती-पत्नीचे भांडण सुरु असताना या भांडणात सासूने हस्तक्षेप केल्यामुळे संतप्त झालेल्या जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले. ही घटना औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या अनीस शरिफ भिस्ती याचे पत्नीशी भांडण झाले होते. यावेळी त्याच्या पत्नीने आपल्या आईला बोलावून घेतले. त्यानंतर भिस्ती याची पत्नी तिच्या आईसोबत माहेरी निघून गेली. बायको माहेरी निघून गेल्याचा राग आल्याने भिस्ती याने बायकोला जाब विचारला. यावेळी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला व त्याने बायकोला मारहाण केली. यावेळी सासू ज्योती ठाकूर यांनी या वादात हस्तक्षेप केला. याचा राग आल्याने अनीस याने जमिनीवर पडलेली वीट ज्योती ठाकूर यांच्या डोक्यात मारत जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.