जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह व अश्लाघ्य वक्तव्य करून महिलांचा अपमान केल्यामुळे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. सदर निषेध आंदोलन करतांना कार्यकर्त्यांच्या विशेषतः महिलांच्या भावना अत्यंत तिव्र होत्या. “50 खोके घेऊन माजले बोके, महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारचा निषेध असो, अब्दुल सत्तार हाय हाय” अशा विविध घोषणा देऊन अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी आसमंत दणाणून सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात रास्ता रोको करत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी काळे फासले. सदर आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटिल, महानगर अध्यक्ष अशोक लादवंजारी, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटिल, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटिल, प्रवक्ते योगेश देसले, युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी, उमेश नेमाडे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुशील शिंदे, अरविंद मानकरी, नईम खाटिक, प्रतिभा शिरसाठ, शालिनी सोनवणे, संजय जाधव, सलीम ईनामदार, जितेंद्र बागरे, राहुल टोके, हितेश जावळे, अनिल पवार, ललित नारखेडे, दत्तात्रय सोनवणे, रमेश बहारे , अशोक सोनवणे, कुंदन सूर्यवंशी, रफिक पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.