मुक्ताईनगर : दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा गावातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गजानन विनोद कांडेलकर (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. गजानन हा रात्रीच्या वेळी आपला सोबती दिनेश प्रकाश खिरळकर याच्यासोबत मोटारसायकलने घराकडे येताना धानोरा, जि.बुलढाणा येथे त्याचा अपघात झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील रहिवासी गजानन कांडेलकर (वय १८) हा काही कामानिमित्त बुलढाणा येथे गेला होता. येथून आपल्या मित्रांसोबत परत घराकडे येताना रात्र झाली. मात्र, रात्रीच्या वेळेस विटाळी, धानोरा, जि.बुलढाणा येथे त्याचा अपघात झाला. त्या दोघांना तत्काळ मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
जखमी तरुणावर उपचार सुरु
रुग्णालयात प्रकृती अधिक खालावल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगावकडे जात असताना त्यांना मुक्ताईनगर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गजानन यास मृत घोषित केले. तर त्याचा सोबती दिनेश खिरळकर (वय २५) याला गोदावरी हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री भरती करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.