नवी दिल्ली: फॉरेस्ट गार्ड मुख्य परीक्षेसाठीच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता उमेदवार या पदांसाठी 09 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग (UPSSSC) ने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
UPSSSC फॉरेस्ट गार्ड किंवा वन रक्षक मुख्य परीक्षा 2022 च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे 06 नोव्हेंबर 2022 रोजी खंडित झाली होती. त्यामुळे या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता उमेदवार 09 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख आणि अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख फक्त 13 नोव्हेंबर 2022 आहे. या तारखांमध्ये कोणताही बदल नाही.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी या थेट लिंकवर क्लिक करा- http://upsssc.gov.in/
या तारखा लक्षात ठेवा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 17 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत : 09 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन फी जमा करण्याची आणि फॉर्म दुरुस्त करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2022
वयोमर्यादा:
1 जुलै 2022 रोजी उमेदवारांचे वय 21-40 वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
मुख्य परीक्षेसाठी अर्ज कसा करावा
UPSSSC फॉरेस्ट गार्ड मुख्य परीक्षेसाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट upsssc.gov.in ला भेट द्यावी लागेल. पुढे, होमपेजवर, “फॉरस्टर” ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा. आता या पदासाठी अर्ज करा आणि अर्ज भरा. त्यानंतर, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि सबमिट करा. आता भरलेला अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.