भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ तीन जणांच्या संशयास्पद हालचालींवरून सुरक्षा राक्षकाने हटकले असता, या तिघांनी पळ काढला. हे तिघे दुचाकी आणि बेसजॅक चोरीच्या प्रयत्नांत होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघं संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा पर्यवेक्षक अरुण सुभाष पाटील (वय ३२, रा. दीपनगर कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटलंय की, संशयीत रोशन सुरेश बार्हे, प्रशिक सुनील जोहरे (दोन्ही रा.पिंपळगाव खुर्द) व दीपक उर्फ गोलू सुरवाडे (निंभोरा) यांनी प्रकल्पातून दुचाकी (एम.एच.१९ डी.जे. ६०१९) तसेच १० हजार ८०० रुपये किंमतीचे बेसजॅक व लोखंडी यु जॅक लांबवले.
तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मात्र, चोरी होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पाठलाग केल्यानंतर चोरटे पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रोशन व प्रशिकला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.