मुंबई : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जगात पहिल्यांदाच लॅबमध्ये रक्त तयार करण्यात आले आहे. एवढंच नाही तर हे रक्त पहिल्यांदाच दोन लोकांना देण्यात आले आहे. एखाद्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या रक्ताची ही पहिलीच चाचणी आहे. पण जर ती यशस्वी ठरली तर वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. कारण रक्तासंदर्भातल्या आजारांवर हे डुप्लिकेट रक्त संजीवनी ठरू शकतं.
लॅबमध्ये तयार झालेल्या रक्तामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांसाठी ते वरदान ठरणार आहे. कारण दुर्मिळ रक्तगट असलेल्यांना रक्त मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामुळे अनेकांचा जीवही जातो. वैज्ञानिकांनी रक्तदातांच्या स्टेम सेलपासून हे रक्त विकसीत केलं आहे. क्लिनिकल टेस्टसाठी कमीत कमी चार महिन्यांत 10 लोकांना दोन वेळा हे डुप्लिकेट रक्त चढवण्यात येईल.
उपचारांमध्ये क्रांती घडणार
जागतिक क्लिनिकल चाचणीमध्ये मानवांना लॅबमध्ये तयार करण्यात आलेले कृत्रिम रक्त दिले गेले आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत वाढलेल्या रक्तपेशींचा वापर जगातील अशा पहिल्या क्लिनिकल चाचणीसाठी करण्यात आला. दरम्यान, कृत्रिम रक्त सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाल्यास, मानव निर्मित रक्तपेशी सिकलसेल आणि दुर्मिळ रक्त प्रकार यासारख्या रक्त विकार असलेल्या लोकांच्या उपचारांमध्ये वेळेत क्रांती घडवू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
केंब्रिज विद्यापीठात झाले संशोधन
यूकेमधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांसह या टीमने सांगितले की, रक्तपेशी दात्यांच्या स्टेम पेशींपासून वाढविण्यात आल्या. लालपेशीनंतर त्या निरोगी व्यक्तीला देण्यात आल्यात. प्रयोगशाळेत तयार केलेल्या लाल रक्तपेशी दुसऱ्या व्यक्तीला रक्त संक्रमणाच्या चाचणीचा भाग म्हणून दिल्या जाण्याची ही जगात पहिलीच वेळ आहे, असे केंब्रिज विद्यापाठातील संशोधकांच्या टीमने म्हटले आहे.