पिंपरी : सोशल नेटवर्किंग साइटमुळे गुन्हे आणि अत्याचार होण्याचे प्रकार आजकाल खूपच वाढले आहे. नुकतंच फेसबुकवरुन ओळख झालेल्या तरुणानं एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज रमेश शिरभाते (वय 45, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने एका महिलेशी फेसबुकवर मैत्री करुन लग्न करण्याचे आमिष दाखवून दाखविले. गेल्या चार वर्षांपासून आरोपी महिलेवर बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना 2019 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पिंपरी परिसरात घडली.
जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
फिर्यादी महिलेची त्यांच्या पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना त्यांची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.