जळगाव : जिल्ह्यात गेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक नियुक्त केले आहे. या पथकाने मोठी कामगिरी केली असून, दोघा दुचाकी चोरट्यांसह 15 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील दोन तरुण चोरी केलेल्या दुचाकी कमी किमतीत विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी या कामी तपास करण्यासाठी पथक नियुक्त करुन चौकशीचे आदेश दिले होते. या पथकाने दिपक संजय शेटे (रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा) व नविद शेख इजाज (रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा) या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यांनी केली कारवाई…
पोहेकॉ गोरखनाथ बागुल, पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पोहेकॉ अश्रफ शेख, पोहेकॉ संदिप सावळे, पोना. प्रविण मांडोळे, पोना. परेश महाजन, पोना. रविंद्र पाटील, पोकॉ लोकेश माळी, पोहेकॉ भारत पाटील, पोकॉ. प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.