मुंबई : अनेकदा असं म्हटलं जातं की जर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्ही जीवनात काहीही मिळवू शकता आणि कोणतीही अडचण तुमच्या मार्गात येणार नाही. मराठवाड्यातील जालना येथील रहिवासी असलेल्या अन्सार अहमद शेखने ते खरे करून दाखवले आणि आयुष्यातील अनेक मोठ्या अडचणींवर मात करून आयएएस अधिकारी बनले. अन्सार अहमद शेखने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत 371 वा क्रमांक पटकावला.
अन्सार अहमद शेख हा जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातला रहिवासी असून, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. अन्सारच्या कुटुंबाची परिस्थिती इतकी बिकट होती की त्याचे शिक्षण करणेही शक्य झाले होते. अन्सार सांगतो की नातेवाईक आणि वडिलांनी त्याला अभ्यास सोडण्यास सांगितले होते.
बारावीत 91 टक्के गुण मिळाले
अन्सार अहमद शेख यांनी सांगितले की, वडिलांनी अभ्यास सोडण्यास सांगितले होते. शाळेतून नाव काढण्यासाठी वडिल थेट शाळेत पोहोचले, परंतु शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले मुलगा अभ्यासात खूप चांगला आहे त्याला शिकू द्या, यानंतर कसा तरी दहावी पास केली. त्यानंतर बारावीत 91 टक्के गुण मिळाल्यावर घरच्यांनी पुन्हा अभ्यासासाठी थांबले नाही.
वडील चालवायचे रिक्षा
अन्सार अहमद शेख यांनी सांगितले की, त्यांचे वडील ऑटोरिक्षा चालवायचे आणि आई शेतात मजुरी करायची. अन्सारने सांगितले की, वडिल रोज फक्त शंभर ते दीडशे रुपये कमावत होते. ज्यामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवणे खूप कठीण होते आणि अशा परिस्थितीत त्यांचे वडील अभ्यासासाठी पैसे देऊ शकत नव्हते.
अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी वेटरची नोकरी
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अन्सार अहमद शेख यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी त्याने हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. अन्सार अहमद शेखने सांगितले की, ‘मी पैशासाठी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. इथल्या लोकांना पाणी देण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत काम केले.
अशा प्रकारे मिळाले यूपीएससीमध्ये यश
अन्सार अहमद शेख यांच्या कठोर परिश्रम आणि संघर्षासमोर संकटांनी हार पत्करली आणि 2015 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. अन्सारने देशात 371 वा क्रमांक मिळवला आणि आयएएससाठी निवड झाली.