मुंबई : शेअर बाजार चढ-उतारांनी भरलेला असतो असं म्हणतात. गुंतवणूकदारांसाठी कोणता शेअर कधी फायदेशीर ठरेल आणि तो कुठून कुठपर्यंत नेईल हे सांगता येत नाही. आम्ही अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल बोलत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना लाँगटर्ममध्ये श्रीमंत बनवले आहे. दीपक नायट्रेट या केमिकल सेक्टरमधील कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 वर्षांत एवढी गती मिळवली की गुंतवणूकदार चक्रावले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यात निश्चितच घट झाली आहे.
दीपक नायट्रेटच्या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे ग्राहकांना मोठा नफा झाला आहे. 2010 नंतर कंपनीचे शेअर्स रॉकेट स्पीडने वाढले आणि ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 13,000 रुपये गुंतवले होते ते काही दिवसात करोडपती झाले. 15 नोव्हेंबर 2002 रोजी शेअर्समधील तेजीबद्दल बोलायचे झाले तर शेअरची किंमत फक्त 2.83 रुपये होती. त्याच्या किमती एका दशकापर्यंत म्हणजे 2010 पर्यंत हळूहळू वाढल्या, पण त्यानंतर त्या झपाट्याने वाढत गेल्या.
2010 नंतर हा स्टॉक रॉकेट बनला
या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 1 ऑक्टोबर 2010 रोजी 17.81 रुपये होती. आणि 5 ऑगस्ट 2016 रोजी तो प्रथमच 100 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. 19 डिसेंबर 2020 रोजी, दीपक नायट्रेटच्या एका शेअरची किंमत 922 रुपये झाली होती. यानंतर, गेल्या दोन वर्षांत शेअर्सच्या वाढ सुरुच असून, 15 जानेवारी 2021 रोजी त्याने 1000 रुपयांची पातळी ओलांडली. गेल्या वर्षी, 14 ऑक्टोबर 2021 रोजी, तो 2897.80 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर त्यात घट होऊ लागली.
या वर्षी घट नोंदवली गेली
वर्ष 2022 च्या सुरूवातीला, 14 जानेवारी रोजी दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत 2,659.85 रुपये होती, जी 20 मे 2022 रोजी 1,964.85 रुपयांपर्यंत खाली आली. मात्र, पुन्हा एकदा त्यात थोडीशी सुधारणा झाली आणि गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर 2119 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 28,901.69 कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदारांचे नशीब उजळणारा शेअर
हा शेअर गुंतवणूकदारांचे नशीब उजळणारा ठरला असला तरी, अलीकडच्या काळात या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे ब्रोकरेज हाऊसने विक्रीचे रेटिंग कायम ठेवले आहे. मात्र, त्या शेअर्समध्ये रिकव्हरीचा टप्पाही सुरू आहे. HDFC सिक्युरिटीजच्या मते, कच्चा माल, युटिलिटीज आणि लॉजिस्टिक्सच्या जास्त किमतीमुळे कंपनीच्या मार्जिनवर दबाव येईल.