नवी दिल्ली : महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. अनेकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स भरावा लागतो, मात्र केंद्र सरकार लवकरच टोल टॅक्सशी संबंधित नियम बदलणार आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, टोल टॅक्सशी संबंधित विधेयक आणण्याचा सरकारचा विचार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, सध्या देशात टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. पण रस्ते विकासासाठी निधीची मोठी आवश्यकता असते. त्यासाठी टोल टॅक्स तर बंद होणार नाही. पण वसूल करण्याची पद्धत बदलेल.
थेट खात्यातून कापला जाणार टोल टॅक्स
आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल. टोल टॅक्स वसूलीसाठी तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही पद्धत बदलण्यात येणार आहे. या सर्वासाठी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल टॅक्स थेट तुमच्या खात्यातून कापल्या जाणार आहे.
टोल नाक्यावरील वाद संपणार
नवीन नियमामुळे टोल नाक्यावर तास न तास थांबण्याची गरज राहणार नाही. तसेच चिल्लर, रोखीचे कोणतेही वाद होणार नाही. तसेच फास्टटॅगची झंझटही संपणार आहे. पण टॅक्समधून तुमची काही सूटका होणार नाही. थेट बँक खात्यातून रक्कम वळती होणार आहे.
इतका भरावा लागणार टॅक्स
गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, 2024 मध्ये देशात एकूण 26 ग्रीन एक्सप्रेसवे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत ग्रीन एक्सप्रेसवे बाबत भारत अमेरिकेची बरोबरी करणार आहे. आता नवीन नियमानुसार, तुम्ही जेवढे अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागणार आहे. पूर्वी 10 किलोमीटर अंतर कापले तरी 75 किलोमीटरपर्यंताचे शुल्क भरावे लागत होते. आता यामध्ये बदल करण्यात येणार आहे.