जळगाव राजमुद्रा |गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या वावरात सापडलेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संस्थेत विविध प्रकारच्या चौकशी सुरू असताना खळबळ जनक घटना घडली आहे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. यापूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दूध संघात झालेल्या अपहारा प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी स्वतः फिर्याद देत या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला होता.
दूध उत्पादक संस्थेमध्ये झालेला अपहरणातून चोरी असल्याचे राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती मात्र पोलिसांनी खडसे यांची मागणी रात्रभर उपोषण केल्यावर देखील फेटाळून लावली होती.
दरम्यान जळगाव पोलिसांकडून कार्यकारी संचालकांना अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येत आहे याबाबत झालेल्या कारवाईने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी संचालकांना झालेले अटक दूध संघाभोवती चौकशीच्या समेरा अधिक घट्ट करणारी आहे.