जळगाव राजमुद्रा | शहरात गेल्या अनेक दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडत असताना एका नामांकित व्यावसायिकाच्या निवासस्थानात चक्क शस्त्रद्वारे असलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील नामांकीत वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरावर पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपाच्याकडे फिरवायला सुरुवात केली आहे.
यावेळी दरोडेखोरांनी संगम सोसायटी येथून दोन भागात पसार झाले एक रस्ता यशवंत कॉलनी आमदार राजुमामा भोळे यांच्या निवस्थानाकडील गल्लीतून तर उर्वरित दोन जण हे दीनानाथ वाडी येथून पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये निष्पन्न झाले आहे.
व्यवसायिक बच्छाव यांच्या सुपुत्र यांनी स्वतः घडलेली घटना राजमुद्रा कडे कथन केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासह नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे गेल्या अनेक वर्षापासून परिवारासह रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत वास्तव्यास आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक असलेले बच्छाव सर आपल्या मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेले होते. व्यावसायिक कारणाने मोठा मुलगा किरण बच्छाव हे भुसावळ रोड येथील फर्म ( शोरूम) होते. तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते.
दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर मध्ये किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. योगायोगाने काही मिनिटात किरण बच्छाव देखील घरी पोहचले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील त्यांचा हात बांधत बंगल्याच्या मागील बाजूस घेऊन गेले, घरातील पैसे आणि मौल्यवान दागिने कुठे आहेत, अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी मागे दरवाजा नाही असे सांगितले. दरोडेखोर हे पुढील प्रवेशद्वाराने पसार झाले
६ दरोडेखोर असल्याचा संशय
बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी मागील बाजूने पळ काढला. दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी दोघांकडे पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. पिस्तूल नकली असल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह अधीक्षक श्री.गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस पोहचले आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्यासह नातलग विचारपूस करीता घटनास्थळी दाखल झाले होते.