नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घोटाळेबाज मोबाईल ॲप्सद्वारे लोकांनाही लक्ष्य करतात. तुमच्या या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. अनेक सुरक्षा तपासण्यांनंतरही, स्कॅमर Google Play Store वर मेलवेअर किंवा व्हायरस असलेली ॲप्स उपलब्ध करून देतात.
युजर्सच्या वैयक्तिक डेटाशिवाय, हे ॲप्स मोबाइल बँकिंग तपशील देखील चोरतात. मेलवेअरने भरलेले हे अँड्रॉइड ॲप्स युजर्सचे लॉगिन तपशील, खाते क्रमांक आणि इतर आर्थिक तपशील चोरतात. तुम्हाला हे 5 धोकादायक अँड्रॉइड ॲप ताबडतोब डिलीट करावे लागतील.
सायबर सिक्युरिटी कंपनीने दिला इशारा
हे ॲप्स तुमचा डेटा तर चोरतीलच पण त्यांच्या मदतीने तुमचे बँक खातेही रिकामे करतील. या प्रकरणात आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी थ्रेट फॅब्रिकने सांगितले आहे की, युजर्सने या ॲप्सबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे ॲप्स थर्ड पार्टी ॲप्सवरही उपलब्ध आहेत. अनेक वेळा लोक मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप्स इन्स्टॉल करतात.
हे 5 ॲप बँकिंग तपशील चोरू शकतात
- Recover Audio, Images & Videos
- Zetter Authentication
- File Manager Small, Lite
- Codice Fiscale 2022
- My Finances Tracker
असे सुरक्षित रहा
तुम्हीही हे अँड्रॉइड ॲप्स इन्स्टॉल केले असतील तर ते तुमच्या फोनवरून लगेच डिलीट करा. याशिवाय सुरक्षिततेसाठी सर्व बँकिंग पासवर्ड आणि पिन बदला. कोणत्याही थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करणे टाळा. याशिवाय, Google Play Store वरून ॲप डाउनलोड करताना, त्याच्या डेव्हलपर आणि रिव्यूकडे नक्कीच लक्ष द्या.