जळगाव: तालुक्यातील रायपूर शिवारातील शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विजय शांताराम धनगर (रा. निमगाव, ता.जि. जळगाव) हा तरुण आपल्या आई वडीलांच्यासह राहायला आहे. रविवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता विजय हा संजय माधव शिरुडे यांच्या शेतात गुरे चारत होता. याबाबत राग आल्याने संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे सर्व रा. निमगाव, ता. जि. जळगाव यांनी हातातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने विजय याचे वडील शांताराम धनगर यांच्या डोक्यात टाकला. त्यानंतर विजय आणि त्याची आई कविता यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यांच्या विरुध्द गुन्हा दाखल
याप्रकरणी शांताराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदसर काझी करीत आहे.