धरणगावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन ; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुख्याधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम करताय : निलेश चौधरी
धरणगाव राजमुद्रा | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून धरणगाव पाणी प्रश्नावर थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार पण धरणगावकरांना आधी पाणी द्या अशी थेट मागणी ( मूळ ) शिवसेने कडून करण्यात आले आहे. हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
धरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप धरणगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे धरणगाव पाणी प्रश्न राज्याचे पाणीपुरवठा मंत्री त्याच मतदारसंघातील असून देखील अद्याप पर्यंत भेटलेला नाही अनेक आश्वासन आतापर्यंत या ठिकाणी देण्यात आले मात्र तरी देखील धरणगावकर पाण्यापासून वंचित असल्याचं निलेश चौधरी यांनी म्हटले आहे.
यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार, पण धरणगावकरांना पाणी द्या, अशा शब्दात पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी कधी नव्हे ते आताच दबावाखाली काम करत असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे. यावेळी रमेश पाटील, शरद माळी, धीरेंद्र पुरभे, राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.