धुळे: शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणाऱ्या प्रवीण कदम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असून त्याच ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे, याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे प्रवीण कदम यांनी आपल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील निवासस्थानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
प्रवीण कदम हे उत्तम बासरी वादक तसेच कॅसिओ वादक असून त्यांना संगीताची मोठी आवड असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच प्रवीण कदम हे सर्पमित्र देखील होते. त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. यासंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.