जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी आज पुन्हा कारवाई केली आहे. या अपहार प्रकरणातील मुख्य संशयतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपहार प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे.
दूध संघ अपहार प्रकरणात पोलिसांनी आज (दि. १६) मुख्य सुत्रधार सी.एम.पाटील यांना अयोध्या नगरातून सकाळी ११ वाजता शहर ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत सहा जणांना अटक
या प्रकरणातील मुख्य सुत्राधार मानले जाणारे सी.एम. पाटील यांना देखील शहर पोलीसांनी अयोध्या नगरातून बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकुण आरोपींची संख्या ६ वर पोहचली आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक रवि पाटील यांनी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात सी.एम.पाटील यांची चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.