जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बी एच आर प्रकरणात शैक्षणिक, सहकार, उद्योजक व्यापारी अडकले असल्याने आता सर्वांच्या नजरा या गैरव्यवहारात जळगाव जिल्ह्यातील एका मोठ्या आमदाराचे आर्थिक व्यवहार पोलीस पथकाच्या बारीक नजरेत असून लवकरच याचा पडदा फाश होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असून त्याकडे ठेवीदारांसह जनतेचे लक्ष लागून आहे. दरम्यान संबंधित जिल्ह्यातील आमदार पोलीस पथकाला चकवा देत असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित आमदाराला ताब्यात घेतल्या नंतरच खरी वस्तुस्थिती जनतेसमोर उघडकीस येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले, त्या आमदाराला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा आधार घेतला जात असल्याचे वृत्त आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे अवसायकाच्या कार्यकाळातील कोट्यावधीच्या कारवाईत उद्योजक, व्यावसायिक, राजकीय कार्यकर्त्यां सह १२ जणांच्या अटकेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील एका आमदाराचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या नजरेत असून संबंधित आमदार जिल्ह्यातून पसार झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी अटक झालेल्या व्यावसायिक भागवत भंगाळे, डाळ उद्योजक प्रेम कोगटा एका माजी मंत्र्याचे कट्टर समर्थक यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांना पथकाने न्यायलयात हजर केले असता २२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बी एच आर पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहारातील प्रकरण थंड होत नाही तोच अवसायक नियुक्ती नंतरच्या काळातही त्यापेक्षा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पुणे डेक्कन पोलिसात गुन्हे दाखल आहेत. आधीच्या पहिल्या प्रकरणात सी ए ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष मुख्य सूत्रधार सुनील झवर यांच्या मुलाला अटक झाली होती, आता नंतरच्या टप्प्यात १२ जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी आधीच्या टप्प्यातील अटकसत्र नंतर गुरुवारी १२ जणांना पथकाने ताब्यात घेतले त्यापैकी अंबादास मानकापे औरंगाबाद , प्रेम नारायण कोगटा आणि जयश्री तोतला यांना न्यायालयात हजार केले असता २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपी भागवत भंगाळे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, आसिफ तेली, जयश्री मणियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रमोद कापसे, प्रीतेश जैन यांना न्यायालयात हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.