नशिराबाद (प्रतिनिधी) डोळ्यात औषध टाकण्याचे बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ६० वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, परिसरातील एका गावात हेमराज भोजू चौधरी (वय ६०) याने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस डोळ्यात औषध टाकण्याचे बहाणा करुन तिला घरी बोलावुन घेतले. यानंतर हेमराज चौधरी याने पिडीत मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.
घड्याळ देण्याचा बहाणा करून विनयभंग
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका गावात ११ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ जुलै २०१७ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना गावातील मनोज सुरेश सोनवणे (वय-२७) रा. ममुराबाद ता.जि. जळगाव याने मुलीला घड्याळ देण्याचा बहाणा करून तिचे तोंड दाबत तिचा विनयभंग केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व पुराव्या अंती न्यायालयाने मनोज सुरेश सोनवणे याला दोषी ठरवत विविध कलमान्वये ४ वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.