जळगाव राजमुद्रा | तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगल्या उद्देशाने मदतगार ठरले असाल तर संकटांच्या काळात तुमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक उदाहरणे राजकारणात, समाजकारणात दिसून येतात. यानिमित्ताने जळगावकरांना माजी मंत्री सुरेश दादा जैन यांची आठवण झाली आहे. “दादा तुम्ही परत या..” आणि जळगावचे रस्ते तयार करा.. असे सोशल मीडियावर कॅम्पेन राबवले जात आहे.
सुरेश दादांच्या काळात उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा नागरिकांना आज देखील भावत आहे. अनेक व्यापारी संकुल आहे, रस्ते विकासासाठी राबविण्यात आलेला अटलांटा प्रकल्प, जळगाव शहराच्या औद्योगिक प्रकल्पासाठी उभारण्यात आलेले विमानतळ असे अनेक दूरदृष्टी असलेले निर्णय सुरेश दादांच्या काळात एक सूत्री कारभारातून घेण्यात आले.
शहरात सध्या खड्ड्यांचे भीषण अवस्था निर्माण झाले आहे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ही अवस्था कायम आहे. मात्र जळगाव ते लोकप्रतिनिधींचा साप दुर्लक्ष या समस्या कडे आहे. अनेक नेते लोकप्रतिनिधींनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या मात्र त्यांनी देखील या समस्येकडे दुर्लक्ष केले याचा सर्वाधिक फटका जळगाव शहरातील नागरिकांना बसत आहे. नागरिकांनाच नव्हे तर जळगाव शहरातील व्यापाराला देखील याचा फटका बसला आहे.
या निमित्ताने सोशल मीडियावर जोरदार शहराच्या खड्डेमय परिस्थिती वर कॅम्पेन राबवले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रोश निर्माण होत आहे. अनेक आंदोलन केल्यावर देखील रस्त्यांची काम होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. सध्या जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या महापौर व भाजपमधून आयात झालेले बंडखोर उपमहापौर आहेत.
मात्र राज्यातील शिंदे गटाचे व भाजपचे सूत जोडून आल्याने त्याचा फटका जळगाव शहराच्या विकासाला देखील बसला असल्याचे सांगितले जात आहे. कारण महापौर जयश्री महाजन यांच्याकडून सतत राज्यातील सरकारकडून निधी दिला जात नसल्याचा आरोप होत आहे.
मात्र त्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा जळगावकरांना मिळत नसल्याने राज्यातील सत्ताधारी तसेच महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांन विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. 0म्हणूनच सुरेश दादांच्या च्या चाहत्या नागरिकांनी सोशल मीडियावर दादा पुन्हा या अशी साद घातली आहे.
घरकुल घोटाळ्यामुळे सुरेश दादांचे 35 वर्षाचे राजकारण संपुष्टात आले, यामुळे अनेक कायदेशीर अडचणीमुळे अद्याप देखील त्यांना जळगावत येता येत नाही. मात्र तो देखील कायदेशीर तिढा लवकरच सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. घरकुल घोटाळ्यातील विशेष सरकारी विधीतज्ञ प्रवीण सूर्यवंशी यांचे नाव पेन ड्राईव्ह प्रकरणात आल्यानंतर घरकुल घोटाळ्यासह अन्य कामकाज राज्य शासनाकडून काढून घेण्यात आले आहे. घरकुल घोटाळ्यासाठी लवकरच विशेष सरकारी विधीतज्ञ यांचे नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाणार आहे. त्यानंतरच घरकुल घोटाळ्यातील शेवटच्या टप्प्यातील कामकाज पूर्णत्वास येणार असल्याचे समजते आहे. सुरेश दादा जळगावात पुन्हा येतील असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. मात्र सुरेश दादा राजकारणात सक्रिय होतील का ? याबाबत अनिश्चितता कायम आहे. झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित आहे.