धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज धरणगाव तालुका काँग्रेस कडून धरणगाव शहरात धान्य वाटप करण्यात आले. धरणगाव शहरातील पारोळा नाक्या जवळील गरीब वस्तीत, संजय नगर, मातंग वाडा, भडंगपुरा या भागात गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला.
त्याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष निळकंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सम्राट परिहार, तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, डॉ. व्ही.डी.पाटील, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, संजय गांधी समितीचे संचालक महेश पवार, किसान सेलचे अध्यक्ष सुरेशसिंग चव्हाण, दीपक जाधव,मनोज कंखरे, नंदलाल महाजन, विजय जनकवार, ध्रुवसिंग बिसेन, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, गोपाल पाटील, वाल्मिक पाटील, आर. एच. पाटील, सुनील बडगुजर, सलीम मिस्तरी, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.