मुंबई : जागतिक मंदीच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, कर्मचारी छाटणीच्या काळात एक चांगली बातमी आली आहे, जी तुम्हाला करोडपती बनण्याची मोठी संधी देणार आहे. लाखो रुपये कमवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागणार नाही, तर फक्त आयडिया द्यावी लागेल. जर तुमची आयडिया आवडली असेल तर एका झटक्यात दोन ते चार लाख नाही तर तब्बल 81 लाख रुपये तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील. एका अमेरिकन कंपनीनं लोकांना ही ऑफर दिली आहे.
जगभरातील कंपन्यांमध्ये कर्मचारी छाटणीची प्रक्रिया सुरू आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा, एलोन मस्कचे ट्विटर किंवा जेफ बेझोसचे ॲमेझॉन, सर्वत्र कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. अशा परिस्थितीत कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनी डे वन व्हेंचर्सने लक्षाधीश बनवण्याची ऑफर आणली आहे, ती छाटणीत कामावरुन कमी झालेल्या कर्मचाऱ्यांना एक लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 81 लाख रुपये कमावण्याची संधी देत आहे.
कंपनी शोधतेय स्टार्टअप आयडिया
या ऑफरमध्ये सामील होऊन, कंपनीकडे तुम्हाला फक्त एक उत्तम स्टार्टअप कल्पना द्यायची आहे. ही स्टार्टअप कल्पना अनोखी असावी ज्यावर ती पुढे नेली जाऊ शकते. कंपनीची एक टीम या कल्पनेच्या सर्व पैलूंचा विचार करेल आणि निवडल्यास तुम्हाला एक लाख डॉलर्स हस्तांतरित केले जातील. त्यामुळे ही एक मोठी फायदेशीर डील नाही असेल, जी तुम्हाला घर बसल्या लाखो रुपये कमावून देऊ शकेल.
लाखो डॉलर्सची गुंतवणूक
डे वन व्हेंचर्सने कंपनीच्या ‘फंडेड नॉट फायर्ड’ कार्यक्रमांतर्गत ही करोडपती बनवण्याची ऑफर आणली आहे. सुमारे 20 कंपन्यांमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. कंपनीच्या संस्थापक मासा बुशर आहे आणि तिला देखील दोनवेळा कामावरुन कमी करण्यात आले होते. सीएनबीसीच्या अहवालानुसार, मासा यांनी सांगितले की छाटणी त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे.
फायदेशीर सौदा
एंजेल इन्वेस्टर मासा बुशरने दोनवेळा नोकरी गमावल्यानंतर वेंचर कॅपिटल फर्म डे वन वेंचर्स कंपनी सुरु केली. त्या म्हणतात की वेंचर कॅपिटलिस्ट अब्जावधी डॉलर्स घेऊन बसले आहेत, तर आमच्याकडे अभियांत्रिकी, सेल्स, सपोर्ट स्टाफ आणि इतर क्षेत्रातील हजारो प्रतिभा आहेत ते नवीन संधी शोधत आहेत. अशा परिस्थितीत, अशा प्रतिभावान लोकांना थेट काही पैसे देणे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरू शकते.