धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने धरणगाव शहर शिवसेना मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने शासनाचे सर्व नियम व अटी पाळून साजरा करण्यात आला.
शहरातील सोनवद रोड व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील अमरधाम स्मशानभूमी येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते गरीब व गरजूंना मिष्ठान्न भोजन देऊन अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, धरणगाव लोकनियुक्त नगर अध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी यांच्यासह नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठाण, किरण मराठे तसेच शिवसैनिक रवींद्र जाधव, मच्छिंद्र पाटील, तोह्सीफ पटेल, वाल्मिक पाटील, दिलीप पाटील, मोहन महाजन, कमलेश बोरसे, विषाल महाजन, राहुल रोकडे, यशवंत चौधरी, सचिन सोनवणे, गुड्डू पटेल, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, ज्ञानेश्वर माळी, गजानन महाजन, चेतन जाधव, सतीश बोरसे, विलास पवार, करण वाघरे, पापा वाघरे, परमेश्वर माळी, संजय धामोडे, छोटू चौधरी आदी उपस्थित होते
अन्नधान्याच्या कार्यक्रमासाठी दीपक महाजन दीपेश सोनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी व शहर प्रमुख राजेश राजेंद्र महाजन यांनी आभार मानले.