मुंबई : सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानच्या 154 वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील भाग पाडकामास आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन मार्गावरील 36 मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे दोन दिवस रेल्वे वाहतुकीची कोंडी होणार आहे.
कर्नाक पुल धोकादायक असल्याने तो पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पुलाचे पाडकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरु केले आहे. नवीन पूल महापालिका उभारणार आहे. पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाडकामासाठी मध्य रेल्वेने 27 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. रेल्वे मेगाब्लॉकमुळे उपनगरी गाड्यांच्या जवळपास निम्म्याहून अधिक फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची चिन्हे आहेत.
रेल्वेच्या उपाययोजना
- प्रत्येक स्थानकावर उद्घोषणा,
- प्रत्येक स्थानकावर मदत कक्ष (हेल्प डेस्क)
- प्रत्येक स्टेशनवरील बंदोबस्तात वाढ
- प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेशा तिकीट परतावा खिडक्या.
शनिवारी मेल-एक्सप्रेस रद्द
12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस ,12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस,12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस,17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस निजामाबाद मार्गे, 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस ,17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ,12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ
रविवारी मेल-एक्सप्रेस रद्द
17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ,12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस ,12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस ,12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ ,11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस ,02101 मुंबई – मनमाड विशेष ,12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे, 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस ,12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन ,12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ,12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस ,17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ,11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस ,12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन ,12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस , 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे, 02102 मनमाड – मुंबई स्पेशल , 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ,17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे, 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस, 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस,12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस