जळगाव : सध्या ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढू लागल्या आहे. यामुळेच ऑनलाइन पेमेंट करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकणी सायबर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६२, रा.गजानन कॉलनी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी मोबाईल धारकाने टेक्स्ट मेसेज करुन ‘क्विक सपोर्ट ॲप’ डाउनलोड करण्याची लिंक पाठवली. यावरुन ॲप डाउनलोड करताच अमरेलीवाला यांच्या इंन्डसइन या बँकेतील एकुण २० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत.
ओटीपी मागून ५० हजारांचा गंडा
तर दुसऱ्या एका प्रकरणात अश्विनी जयेश सावकारे (वय ३५, रा. वाघ, जळगाव ) यांना १५ नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञात महिलेनं फोन करत तुमच्या एक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी प्राप्त करुन घेतला. यानंतर सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच जळगाव सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.