जळगाव : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून क्रूरपणे हत्या केली. या क्रूर घटनेचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परीषद जळगाव महानगरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, श्रध्दा वालकर हिच्या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन, आरोपी आफताबला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी निवेदन देताना जिल्हा संयोजक मयुर माळी, प्रांत एकलव्य संयोजक चेतन नेमाडे, शिवा ठाकूर, भवानी पाटील, कुणाल कोळी, अश्विन पाटील, केशव पाटील, ऋषिकेश रावेरकर, शुभम तायडे, जयेश पाटील, कुंदन कोळी, गणेश बाविस्कर, हरीश बुचा, रिषभ शुक्ला, कल्पेश जयस्वाल, ऋषिकेश पाटील व पीयूष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.