जळगाव : शहरातील प्रसिद्ध वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोड्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेनं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील मुख्य म्होरक्या अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर दरोड्याचा कट रचला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली.जळगाव शहरातील प्रसिध्द व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांचे शहरात वाहनांचे शोरुम आहे. ते आयएमआर महाविद्यालयाकडील अजय कॉलनीत राहतात. बच्छाव हे आपल्या लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेलेले होते. दि.१४ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. याबाबत किरण बच्छाव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाईला सुरूवात केली.
जळगाव शहरातील प्रसिध्द व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांचे शहरात वाहनांचे शोरुम आहे. ते आयएमआर महाविद्यालयाकडील अजय कॉलनीत राहतात. बच्छाव हे आपल्या लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेलेले होते. दि.१४ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. याबाबत किरण बच्छाव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाईला सुरूवात केली.
आरोपींमध्ये यांचा आहे समावेश…
या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी तीन पथक नेमून विदगाव, आव्हाणे आणि जैनाबाद येथे रवाना केले. या पथकाने संशयित आरोपी यश सुभाष कोळी (वय-२१), अर्जून नगर ईश्वर कोळी (वय-३०), दर्शन भगवान सोनवणे (वय-२९), करण गणेश सोनवणे (वय-१८), अनिल भानुदास कोळी (वय-३१), सचिन रतन सोनवणे (वय-२७) आणि सागर दिलीप कोळी (वय-२८) सर्व रा. दाजीबा चौक, विदगाव ता.जि.जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी नेमलेल्या तांत्रिक विश्लेषण पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदिप सावळे, पोना किरण चौधरी, पोकॉ लोकेश माळी, पथक क्रमांक १ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, पथक क्रमांक २ मध्ये सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, हवालदार राजेश मेढे, पोह संजय हिवरकर, पोह लक्ष्मण पाटील, पोकॉ प्रमोद ठाकुर, पथक क्रमांक ३ मध्ये पोना प्रविण मांडोळे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, रविंद्र पाटील, पथक क्रमांक ४ मध्ये पोलीस हवालदार अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, दर्शन ढाकणे यांचा समावेश होता.