जळगाव राजमुद्रा : येथील जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव येथे मॉडर्न गर्ल्स स्कूल, स्टेट बँक जवळ जळगाव येथे समाज रत्न स्व. आर. टी. अण्णा चौधरी नगर उभारण्यात आलेले असून रविवार, दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता याठिकाणी सदरचा मेळावा संपन्न होणार आहे. सदर मेळाव्यास जवळपास 1500 वधु – वरांची नोंदणी झालेली असून ते आपला परिचय मेळाव्यात करून देणार आहेत.
यावेळी “बंध रेशमाचे” या सूची पुस्तकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यास उपस्थित वधू – वर, पालक व समाज बांधवांसाठी मोफत भोजन, चहा, कॉफी व पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटमय काळा मुळे मोठ्या प्रमाणावर समाजाचाचे एकत्रित करता आलेले नाही मात्र या वर्षी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थिती लावण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. यासाठी युद्ध पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी, सदर कार्यक्रमास राज्यातील व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार असून महाराष्ट्रसह गुजरात, मध्यप्रदेश येथील तेली समाज बांधव मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने वधू – वर, पालक व समाज बंधू भगिनी यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश चौधरी, सचिव नारायण चौधरी तसेच विश्वस्त मंडळाने केलेले आहे.